लाखो भाविकांचे दैवत मानले गेलेले वरोही येथील अवलिया संत परमहंस श्री.तेजस्वी महाराज यांची वयाच्या नव्वदाव्या वर्षानंतर प्रकृती खालावली आहे. दरम्यान भाविकांची वरोडीत दर्शनासाठी गर्दी वाढत आहे. महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून भाविकांनी वरोडीत रामकृष्ण हरि चा नामजप सुरू केला असून, गीता भागवत पारायण सुरू केले आहे.गेल्या सदोतीस वर्षापासून वरोडी येथे तेजस्वी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठी यात्रा भरते. दि. २८ नोव्हेंबर रोजी त्यांचा जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करीत एक लाख भाविकांनी महाप्रसादही घेतला. महाराजांचा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात लाखोंचा भक्त परिवार आहे. गेल्या एक वर्षांपासून वयोमानानुसार महाराज एकाच ठिकाणी असल्याने भाविकांना दर्शन देत. मात्र यात्रा संपताच प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याची माहिती संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमांद्वारे कळताच वरुडी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.