भंडारा: भंडाऱ्यात राजकारण तापलं! आमदार फुके–पटोले यांची साठगाठ ; आमदार भोंडेकरांचा आरोप
भंडारा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून प्रचारसभांना रंग चढू लागला आहे. जिल्ह्यातील चार नगर परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरू असून नुकतेच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी परिणय फुके आणि नाना पटोले यांच्यात साठगाठ झाल्याचा गंभीर आरोप उपस्थित केला.