हिंगणघाट हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने सोयाबीनचे आधारभूत मूल्य ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल निश्चित केले आहे. यंदा या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांना राज्यस्तरीय समन्वयक संस्था म्हणून प्रथमच मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी उत्पादक कंपन्या व इतर सहकारी संस्थांची खरेदी केंद्रे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांनी नोंदणी करून द्यावी असे आवाहन ॲड सुधिरबाबू कोठारी यांनी केले आहे.