शहरातील वाहतूक अधिक सोपी व्हावी आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे सहज व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेतील वडधामणा (अमरावती रोड) ते वानाडोंगरी (हिंगणा रोड) मार्ग क्रमांक ८७ वर ६ बस सुरू करण्यात आल्या आहेत. ही सेवा 5 फेब्रुवारी २०२६ पासून सकाळी ७ वाजता मोरभवन येथील आपली बस टर्मिनल वरून सुरू होणार असून, दिवसभर दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध असतील. या बस संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत धावणार आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त श