डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदुरी येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने रविवार तारीख 18 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर मंथन आणि संघटनेच्या बळकटीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात जिल्ह्यातील शिक्षकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी सदर अधिवेशनाला शिक्षक आमदार सुधाकर अडबले व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित होते