Public App Logo
Profile Picture

गोंदिया पोलीस

@gondia.police
125Followers
0Following
Video 0
Video 1
Video 2
Video 3
Video 4
Video 5
Video 6
Video 7
Video 8
Video 9
Video 10
दिनांक :-१४/०४/२०२६

पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर मपोका पल्लवी वैभव गजभिये यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश लावुन उपस्थितांना थोडक्यात माहीती सांगितली.

सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह श्री रामदास शेवते प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया पोनि रामेश्वर पिपरेवार तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्राम मलपुरी (पो.स्टे. गोरेगाव) येथे खुन करुन फरार झालेला अज्ञात आरोपीचा शोध घेवुन आरोपी निष्पन्न करुन स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ने केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा
दिनांक 28/3/2026 
दामिनी पथक गोंदिया व जिल्हा महिला बालविकास, इंडियन वेलफेअर सोसायटी गोंदिया यांची संयुक्त कारवाई 
तिरोडा येथे बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच. मा. जिल्हाधिकारी प्रजित नायर, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, मा. जिल्हा कार्यक्रम अधिकारी कीर्ती कुमार कटरे आणि मा.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांचे आदेशान्वये आणि मार्गदर्शनात दामिनी पथकचे गोंदिया चे पोलीस निरीक्षक योगिता चाफले मॅडम, जिल्हा बाल संरक्षण कक्ष , चाइल्ड हेल्पलाइन, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया, दामिनी पथक यांची टीम तयार करून प्राप्त माहितीनुसार होऊ घातलेल्या विवाहातील बालक आणि बालिकेचे जन्म प्रमाणपत्र नगरपरिषद तिरोडा कडून प्राप्त करून घेण्यात आले. सदर प्रमाणपत्रा नुसार बालिकेचे वय बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार पूर्ण नसल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने संपूर्ण टीम तिरोडा येथे 12 वाजता पोहोचले.दामिनी पथक चे पोलीस निरीक्षक योगिता चाफले, सहायक पोलीस निरीक्षक मनिषा निकम मॅडम, पोलीस उपनिरीक्षक पूजा सुरळकर, पो. शि. प्रशांत बनसोड, म. पो. शि. सोनाली टिके, म. पो. शि. प्रीती बुरेले, म. पो. शि, वैशाली भांडक्कर, पर्यवेक्षिका पद्मशाली मॅडम,अंगणवाडी सेविका, नगरसेवक अनिकेत कटरे, वार्ड बाल संरक्षण समितीचे इतर सदस्य यांची बैठक घेऊन सदर होणाऱ्या विवाहाबद्दल माहिती देण्यात आली.
# ईसम शोध #

वय 25 ते 30 वर्ष वयोगटातील ईसम ज्याच्या डाव्या हातावर महाकाल व उजव्या हातावर त्रीशुल चा टॅटु गोंदविले आहे. अशी ईसम आपल्याला आढळल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
पो.नि.पवार, पो.स्टे रावणवाडी 8010908626,
स.पो.नि. नवकर, पो.स्टे रावणवाडी 7972406647
“गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न” करीता निवड झालेले गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशनचे तापसी अधिकारी/भूषण बुराडे, सपोनि/किशोर मावस्कर, पोलीस निरीक्षक/पुरुषोत्तम अहेरकर व पैरवी अधिकारी यांना आज दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि गोंदिया जिल्हा स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शनिवार दिनांक- १७/०४/ २०२६
स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ची धडाकेबाज कामगीरी
मोटार सायकल चोरी करणारे २ अट्ट्ल आरोपी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या जाळ्यात - 
गोंदिया जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे व नागपूर येथील १ गुन्हा उघड - आरोपीतांकडून चोरीचे ३ मोटारसायकल एकूण किमती २,१०,०००/- रूपये जप्त.
शनिवार दिनांक- १८/०४/ २०२६
स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ची धडाकेबाज कामगीरी
मोटार सायकल चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या जाळ्यात - 
पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतून मोटर सायकल चोरी करणारा आरोपीकडून चोरीची १ मोटारसायकल एकूण किमती ५०,०००/- रुपये चा मुद्देमाल जप्त.
गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत अधिकारी अंमलदार यांनां मा. पोलीस महासांचालक यांचे सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.🎉
Video 20
Video 21
# ईसम शोध #

वय 25 ते 30 वर्ष वयोगटातील ईसम ज्याच्या डाव्या हातावर महाकाल व उजव्या हातावर त्रीशुल चा टॅटु गोंदविले आहे. अशी ईसम आपल्याला आढळल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
पो.नि.पवार, पो.स्टे रावणवाडी 8010908626,
स.पो.नि. नवकर, पो.स्टे रावणवाडी 7972406647
Video 23
गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत अधिकारी अंमलदार यांनां मा. पोलीस महासांचालक यांचे सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल हार्दिक अभ...