शेगाव शहरातील चंदाबाई प्लॉट येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून अज्ञात चोरट्याने घरातील ४९ हजार ५०० रुपये लंपास केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, चंदाबाई प्लॉट येथील रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षक विजय तुरेराव देशमुख वय 74 वर्षे हे पुणे येथून शेगांव येथे घरी आले असता त्यांना घरात लाईट दिसला कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटत ठेवलेले नगदी 49500/- रू चोरून नेले.