Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
आज दि २४ ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि खुलताबाद तालुक्यातील वेरूळ लेणीच्या डोंगरातील जोगेश्वरी कुंडात रविवारी फिरण्यासाठी आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्याचा पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला. विटखेडा येथील ९ विद्यार्थ्यांची सहल शिक्षकांसोबत आली होती. चेतन संजय पगडे (१७) कुंडात पडल्याने त्याला वाचवण्यासाठी शिक्षक राजवर्धन अशोक वानखेडे (३०, रा. किन्होळा) यांनी उडी मारली. मात्र चेतनने शिक्षकांना घट्ट पकडल्याने दोघेही बुडाले.