लातूर – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) आयोजित राष्ट्रीय लोकअदालत तसेच ८० टक्के शास्ती माफी योजनेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या एकदिवसीय उपक्रमांतर्गत तब्बल ९०० थकबाकीदार मालमत्ताधारकांकडून ३ कोटी रुपये कर वसूल करण्यात मनपाला यश आले.मनपा मुख्यालयातील लोकअदालतचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. जे. भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.