धुळे जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्था धुळे संलग्न शिंदखेडा शहर नाभिक समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने वारकरी संप्रदायाचे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शिंदखेडा शहरातील बिजासनी मंगल कार्यालय, भगवा चौक, स्टेशन रोड, बस स्टड रोड, शिवाजी चौफुली, गांधी चौक,गणपती मंदिर अशी वारकरी संप्रदायाच्या परपंरेने भजन, टाळ, मुर्दुग च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीचा समारोप बिजासनी मंगल कार्यालयात केला.