व्यंकटेश नगर येथे घरात महिलेची गळफास लावून आत्महत्या व्यंकटेश नगर येथे एका ३१ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.व्यंकटेश नगर येथील दिपाली विशाल बेलोकार वय ३१ वर्ष या महिलेने गळफास लावून घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी कलम १९४ बीएनएसएस नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.