क्रांतीयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. याबाबतचे वृत्त जाहीर होताच कोरेगावात सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे जल्लोष केला. जिलेबी वाटप करत आनंद साजरा केला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अधिकृत घोषणा झाल्यानंतर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.