मालेगाव बोगस जन्म - दाखला घोटाळा प्रकरण,आठवड्याभरात ५०० हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल होणार..किरीट सोमय्या यांचा दावा... Anc- मालेगावातील बोगस जन्म दाखला प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी आज छावणी, किल्ला पोलिस ठाणे अधिकाऱ्यांसह अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेत जन्म दाखला घोटाळा प्रकरणी चर्चा करत पुरावे सादर केले..या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १५०० पानांचे पुरावे सादर केले असून या पुराव्यांच्या माध्यमातून किमान ५०० जणांवर येत्या आठवड्याभरात गुन्हे दाखल होतील.