अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज १२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता अमरावती शहरातील ट्रान्सस्पोर्ट नगर, ट्रान्सस्पोर्ट मार्केट, अबुबकार नगर, सोपीयान नगर परिसरातील नाली, अतिक्रमण, भंगार साहित्य तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तारखेडा येथे सुरु असलेल्या बांधकामांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी संबंधित विभागांना तत्काळ अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सदर जागा विकसित करण्याबाबतही त्यांनी आदेश दिले..