नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावरील पर्यटना दरम्यान भंडारा तालुक्यातील एका पर्यटकाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भंडारा तालुक्यातील खमारी बुटी येथील आशिष टीकाराम समरीत वय २९ हा त्याच्या २० मित्रांसह पर्यटनासाठी गेला होता. २९ ऑगस्ट रोजी त्यांनी कळसुबाई शिखर पूर्ण केला. यानंतर ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान ते हरिहर किल्ला येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणाहून उतरत असताना १२ वा. दरम्यान आशिष याचा तोल जाऊन....