साकोली तालुक्यातील खैरी वलमाझरी या ग्रामपंचायतमध्ये शनिवार दि.30 ऑगस्टला दुपारी4 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले.सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे यांच्या उपस्थितीत गावाजवळील आजूबाजूच्या पिंडकेपार,घानोड,खांबा या ग्रामपंचायतीने दारूबंदी करावी असा ठराव सभेत घेण्यात आला व तीनही गावच्या सरपंचांना निवेदन देखील देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.खैरी वलमाझरी गट ग्रामपंचायत या गावात संपूर्ण दारूबंदी झालेली आहे परिसरातील गावात दारूबंदी व्हावी यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे