औसा -औसा तालुक्यातील बुधोडा येथे आज सकाळी 10 वाजता ग्रामसभा घेण्यात आली होती. मात्र, या ग्रामसभेला सदस्यांची अनुपस्थिती आणि कोणताही महत्त्वाचा विषय चर्चेस नसल्याने ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली.गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये पाण्याचा प्रश्न, गावातील अतिक्रमण, ग्रामपंचायतीच्या रोकड वह्या व लेख्यातील बोगस नोंदी, तसेच आतापर्यंत गावामध्ये झालेली विकासकामे याबाबत प्रश्न उपस्थित केले. तथापि, ग्रामपंचायतीकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.