दहिगाव या गावातील सुरेश आबा नगरातील रहिवाशी इम्रान पटेल या तरुणाची शुक्रवारी हत्या करण्यात आली होती. व ज्ञानेश्वर पाटील, गजानन कोळी या दोघांनी होण्याची कबुली दिली होती. तर या गुन्ह्यात त्यांच्या सोबत यावल शहरातील सुतार वाडा भागातील तुषार राजेश लोखंडे उर्फ जन्नत वय १९ हा देखील असल्याचे त्यांनी सांगितले व त्याला अटक करण्यात आली. बुधवारी त्याला यावल न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.