औंढा नागनाथ शहरासह सर्वत्र दिनांक २७ ऑगस्ट बुधवार रोजी श्री गणेशाची स्थापना होणार आहे तसेच ६ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन आहे या उत्सव काळ अनुषंगाने औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २७ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी साडेबारा वाजता शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला होता. तसेच श्री गणेश उत्सव काळात शहरासह पोलीस ठाणे हद्दीत ठीकठिकाणी तगडा बंदोबस्त नेमण्यात आला असून पायी पेट्रोलिंग साध्या वेशातील पोलिसांचाही बंदोबस्त तैनात आहे.