गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात दोन गंभीर अपघात घडले असून,यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत.गणेश मूर्ती अंगावर पडल्यामुळे हे अपघात घडले असून, दोन्ही मूर्तींचे आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता विसर्जन करण्यात आले आहे.या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.पहिली घटना जवाहरनगर परिसरात घडली.कुंभारवाड्यातील सुतार यांच्या घरी तयार करण्यात आलेली १८ फूट उंचीची मूर्ती फुले मळा परिसरात नेत असताना ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यातील खड्ड्यात अडकल्याने संतुलन बिघडून मूर्ती पडली