किसन नगर येथे 35 ते 40 वर्षे जुने बांधकाम असलेल्या पंचशील निवास या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली होती. माहिती मिळतात सर्व टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि इमारतीची पाहणी केली असता उर्वरित इमारत देखील धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि जीवित हानी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इमारत खाली करून इमारतीतील 25 ते 30 रहिवाशांचे इतरत्र स्थलांतर केले आहे. मात्र अचानक आपल्या डोक्यावरचे छप्पर गेल्यामुळे रहिवाशांवर दुःखाचा डोंगर कोसळला