सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाण्यासाठी नवीन जागेची पाहणी करण्यात आली आहे. सध्याची जुनी इमारत जीर्ण व कमकुवत अवस्थेत असून जागेची कमतरता जाणवली आहे. त्यामुळे जुना तुळजापूर नाका परिसरातील डी-मार्टजवळील महापालिकेच्या तीन जागांची पाहणी बुधवारी सकाळी 11 वाजता करण्यात आली. या तीन पैकी एक जागा पुढील दिवसात निश्चित केली जाणार आहे. पोलीस उपायुक्त विजय कबाडे, गोहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त पोमन, वाहतूक शाखा अधिकारी आदी उपस्थित होते.