बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अद्यापही उघडायला तयार नाही यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने दिलेली आश्वासन पाळली नाहीत. शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी व ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व इतर मागण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.