नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत झालेल्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील उदय नदीला पूर आला आहे. उदय नदीतील पुराच्या पाण्यामुळे प्रसिद्ध बारामुखी धबधब्यानं रौद्ररूप धारण केले आहे. जिल्हा प्रशासनाने काठावरील गावांना सतकतेचा इशारा दिला आहे.