पाचोरा: कृष्णापुरी नदीकाठच्या मातीच्या घरात दबून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू; दुसरा गंभीर जखमी पाचोरा (कृष्णापुरी) हिवरा नदीकाठी असलेल्या कृष्णापुरी, पाचोरा येथे मातीचे घर कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात महेश नितीन पाटील (अंदाजे वय १०) या अल्पवयीन बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्याचा दुसरा भाऊ योगेश बाळू चव्हाण वय १५ हा गंभीर जखमी झाला आहे. योगेशला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.