ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. शहर विकास विभागातील काही अधिकारी आणि नेते संगणमत करून भ्रष्टाचार करत आहेत त्यांची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात मनपा मुख्यालय समोर काँग्रेसने आंदोलन केले असून चौकशीची मागणी काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.