गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाचा आज गुरुवार 28 ऑगस्ट रोजी पाणीसाठा सायंकाळी 4:30 वाजता 414.80 मी. म्हणजे 71% झालेला आहे. प्रकल्पातील सद्यस्थितित उपलब्ध जलसाठा व येणाऱ्या पाण्याची आवक या सर्व बाबी लक्षात घेता सांडव्याद्वारे कोणत्याही क्षणी नदीपात्रात् विसर्ग 'होऊ शकतो. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढवून पुरस्थिति निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती शाखाधिकारी, मासोळी मध्यम प्रकल्प सिंचन, गंगारखेड यांनी दिली आहे.