वानवडी येथे सोपान बागेतील रहिवासी सतीश मकाशीर यांच्या घरातील दागिने चोरीला गेल्याचे वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार घरकाम करणाऱ्या सुधा राजेश चौगुले, बी टी कवडे रोड,घोरपडी गाव हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, कानातले, हिरेजडित दागिने असा एकूण ५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.