आज शनिवार सहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना जवाहर नगर परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र आज रोजी दिसून आले आहे, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडूनही या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.