अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या चिचखंडी ते अंबाजोगाई रस्त्यावर फडकवस्तीवर दुचाकीवरून पडल्याने एका महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुभाबाई गडदे असे त्या मयत महिलेचे नाव आहे भाऊराव गडदे यांच्या फिर्यादीनुसार अशोक गडदे यांच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस हे करत आहेत.