नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज तसेच हक्काचे भूखंड यांचे वाटप करण्याची संधी आज सोमवार २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मला मिळाली. हे आर्थिक पॅकेज व भूखंड हे तुमच्या हक्काचे आहे. या प्रकल्पाला गती देण्याचे काम माझे राहील, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. नरडवे येथे नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज व भूखंड वाटपाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.