आष्टी तालुक्यातील बीड सांगवी या गावात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबिय व ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. अविनाश बापू दिवटे (वय 23, रा. बीड सांगवी) असे मयत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 22 ऑगस्ट) पहाटे अविनाशने आपल्या राहत्या घरी पडवीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घरच्यांनी त्याला या अवस्थेत पाहताच धावाधाव सुरू केली. तातडीने ही माहिती आष्टी पोलिसांना कळवण्यात आली.