देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली. आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजता विधिवत घट स्थापना करण्यात आली .अभिषेक , कुमारिका पूजन करुन घट स्थापना करण्यासात आली . संपूर्ण मंदीर आणि परिसरात फुलांची सजावट करण्यात आली . पहिल्या दिवशी भाविकांची देखिल दर्शनासाठी गर्दी होत आहे . नऊ दिवस माहुर गडावर नवरात्र उत्सव चालणार आहे .मंदीर संस्थाच्या वतीने नऊ दिवस विवीध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे