तालुक्यातील वायगाव येथील श्री जगन्नाथबाबा माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मंगेश बोढाले यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बोढाले यांनी शिक्षणासोबतच विवीध उपक्रमातून सामाजीक जाणीव विद्यार्थ्यांमधे निर्माण करण्याचे कार्य केले.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार मिळाल्याबद्दल बोढाले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.