अकोला हिवरखेड पोलिसांनी 30 ऑगस्ट रोजी ऑपरेशन प्रहार अंतर्गत गोवंश तस्करांवर मोठी कारवाई केली. ही कारवाई मागील तीन दिवसांतील तिसरी असून, सात गोवंशांना जीवदान देण्यात आले. बोलेरो पिकअप क्र. एमएच 27 बीडी 2278 सह 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नदीम खान उर्फ राजा दस्तगीर खानला अटक करण्यात आली असून, एकूण 7 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त केलेल्या जनावरांना गौरक्षण संस्थेत हलवून प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.