लातूर -भटके-विमुक्त, ओबीसी आंदोलनास संरक्षण द्यावे, ओबीसीसाठी असलेल्या आरक्षणातून अन्य कोणास आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आजपासून लातूरच्या महात्मा गांधी चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.विमुक्त भटके आदिवासी महासंघ व ओबीसीच्या वतीने आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून हे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.