अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथे पार पडलेल्या जिल्हा शालेय तायक्वांडो स्पर्धेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आलाय. मूर्तिजापूर येथील विद्यार्थी व शिक्षकांनी थेट आयोजकांवरच चीटिंग केल्याचा आरोप केला आहे.या स्पर्धेत आमचे विद्यार्थी उत्कृष्ट खेळ करूनही मुद्दाम हरविण्यात येत असल्याची तक्रार पालक व शिक्षकांनी केली आहे. आयोजकांच्या जवळील विद्यार्थ्यांना जिंकवून देण्यासाठी हा प्रकार होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय.