भरधाव वेगाने जाणारे दुचाकीस्वार दुभाजकावर आदळून अपघात झाला होता. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता तर दुसरा अभिषेक हरिप्रसाद शर्मा (रा. निमखेडी शिवार) याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता दुध फेडरेशनजवळ घडली होती. याप्रकरणी सोमवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता मयताविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.