मराठा आरक्षणा बाबत शासनाने हैदराबाद गॅजेट लागू केल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला. याच अनुषंगाने आज आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे चौक परिसरात सकल ओबीसी समाजाची बैठक नांदेड मध्ये पार पडली. आगामी दिवसात जिल्ह्यात मोठा लढा उभारणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिवाय 17 सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच एका ही नेत्यांना नांदेडमध्ये फिरू देणार नसल्याचा इशारा ओबीसी बांधवानी दिला.