आज बुधवार दि ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे माजी पदाधिकारी यांच्याकडून केले होते, राज्यातील तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने पाय उतार होण्याच्या दिवशी घाई घाईत आणि हेकेखोरपणाने, नांदेड सचखंड गुरूद्वारा येथे कायदेशीररीत्या अस्तित्वात असणाऱ्या बोर्डाला बरखास्त करून प्रशासकीय राजवट लादली होती, या कृत्यामुळे शिख बांधवांमधील धार्मीक आस्थेवर आणि लोकशाहिप्रणाली तत्वावर घाला घालण्याचा प्रकार झाला.