वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरुन एक तरुणाने नदीत उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता दरम्यान ही घटना घडल्याचे सीसीटिव्ही फुटेजवरून उघडकीस आली. सदर घटना महामार्गावरील सिसिटीव्ही मध्ये कैद झाली असून नदीत उडी मरणारा युवक जैन लेआऊट येथील प्रणय संजय गोखरे (22) असल्याचे बोलले जाते. युवकाची बाईक पुलावर आढळली आहे. घटनेची माहिती मिळताच वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर पोलिस स्टाफसह घटनास्थळी पोहचले आहे.