आज ९ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्वच्छ वायु सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहराने देशभरातील सर्व शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण अमरावती टीमचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये वायू गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग, शाश्वत उपाययोजना आणि प्रशासनाची भूमिका अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात येते.