एकमेकांच्या धर्माबद्दल आस्था ठेवून सण उत्सव साजरे करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शहरातील सांस्कृतिक भवन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये केले आहे. जळगाव जामोद खामगाव व सोनाळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सांस्कृतिक भवन येथे शांतता समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गणेश मंडळाचे अध्यक्ष, राजकीय पदाधिकारी, मुस्लिम बांधव, पत्रकार बांधव पोलीस पाटील इत्यादी हजर होते.