औसा -राज्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी बँकांना कडक इशारा दिला असून “शेतकऱ्यांच्या मागे पीककर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावू नये, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सूचित केले आहे की, बँकांनी शेतकऱ्यांच्या पीककर्ज वसुलीवर तत्काळ स्थगिती द्यावी. तरीदेखील काही बँका शेतकऱ्यांना वारंवार तगादा लावत आहेत.