आमदार संतोष बांगर यांचा नागरी सत्कार सोहळा काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे प्रितेस सारडा यांनी आज दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर व युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांचा भव्य नगरी सत्कार सोहळा सेनगांव शहरातील व्हि के देशमुख मंगल कार्यालयामध्ये दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात येणार होता. मात्र काही कारणास्तव अचानक हा दौरा रद्द झाल्याची माहिती आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दिली.