कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेतनंतर गडचिरोली येथे सुरु झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा वादात सापडले आहे. तात्पुरत्या व्यवस्थेसाठी केलेल्या २८ कोटींच्या विकासकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या आक्षेपानंतर जिल्हाधिकारी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.