चंद्रपुरात स्वतःला कंत्राटी कामगार भासवीत चोरी करणाऱ्या २ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने आज दि ९ सप्टेंबर ला १२ वाजता अटक करीत तब्बल ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई दूरसंचार विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजित अशोक जीवने यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. जीवने यांनी ८ सप्टेंबर रोजी बीएसएनएल कंपनीचे कॉपर केबल चोरी गेल्याची तक्रार, रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.