मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद भंडारा तर्फे सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता हेमंत सेलिब्रेशन हॉल, नागपूर रोड, भंडारा येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर राहणार असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सदस्य, पंचायत समितींचे सभापती-उपसभापती, सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच व अधिकारी तसेच जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख मोठ्या संख्येने सहभागी होणार आह