धाराशिव तालुक्यातील सारोळा गावात दि.२२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मराठा आंदोलकांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची गाडी अडवली.मनोज जरांगे पाटील यांना मुंबई येण्याची वेळ येवु देवु नका,त्यापूर्वीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडे आग्रही मागणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली.यावेळी रामदास आठवले यांच्यासमोर एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तर यावेळी आठवले यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.