लोणंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत अपघात करून पळून गेलेल्या वाहनचालकाला ओळख पटवून स्कॉर्पिओसह ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लोणंद–फलटण रस्त्यावर तरडगाव हद्दीत उड्डाण पुलावर मोटारसायकलस्वारास अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली होती. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता.